सचिन जिरे/सांजवार्ता ऑनलाईन Mar 12, 2020
औरंगाबाद : गुजरात राज्यातील सुरत मध्ये व्यापार्यांची हत्या करून न्यायालयीन निकालाआधी कारागृहात असताना पत्नी आजारी असल्याचे कारण दाखवत चार महिन्यांपासून पसार झालेल्या कुख्यात आरोपीला पुंडलीकनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.अमोल मंगुभाई उर्फ कमलेश सूर्यवंशी वय-24( रा.सुरत गुजरात)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी अमोलने सुरत मधील एका व्यापार्यांची हत्या केली होती, तेव्हा पासून त्यावर अंडर ट्रायल खटला सुरू होता. दरम्यान तो तेथील कारागृहात होता, काही महिन्यातच त्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित असताना आरोपी अमोल ने पत्नी आजारी असल्याचे कारण देत पॅरोल रजा घेतली होती. मात्र रजेची मुदत संपल्यावर हजर होण्याऐवजी तो पसार झाला होता. तेंव्हापासून सुरत पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी अमोलचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे शहरातील बीड बायपास येथे दाखवत होते.त्यावरून सुरत पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसांकडून मदत मागितली. कुठलाही सुगावा नसताना पोलिसांनी खबर्यासह रिक्षा चालकाची मदत घेतली त्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपी अमोल हा मुकुंदवाडी भागात राहणार्या त्याचा चुलता रमेश सूर्यवंशी यांच्या घरात असल्याची माहिती खबर्यांने स.पो.नि घनश्याम सोनवणे यांना देताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.